अनुराधा पाटील



अनुराधा पाटील या मराठीतील प्रसिद्ध कवियत्री, २०१९ चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका आहेत. त्यांचा जन्म ५ एप्रिल १९५३ मध्ये पहूर, ता.जामनेर, जि. जळगाव येथे सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी एस.एस.सी.(इंग्रजी सोडून मॅट्रिक), आर.टी. लेले हायस्कुल, पहूर येथे केले.

प्रकाशित साहित्य -
कविता संग्रह 
* दिगंत (१९८१,१९९०,१९९२)
 * तरीही (१९८५, १९९७)
* दिवसेंदिवस (१९९२,१९९७)
* वाळुच्या पात्रात मांडलेला खेळ (२००५)
* कदाचित अजूनही (२०१७)

प्रौढ साक्षरांसाठी दीर्घ कथा
* नवसाला पावली डॉक्टरीण

अनुवाद पाटील यांच्या कवितेचा हिंदी अनुवाद
* दर असल (२०१२) - अनुवादक - प्रा. निशिकांत ठकार
* अनुराधा पाटिल री टाळवीं मराठी कवितावां : राजस्थानी अनुवाद (२०१८)
* हिंदी, इंग्रजी, उर्दू, उडिया, पंजाबी, राजस्थानी, जपानी इत्यादी भाषांमध्ये व भाषांमधील वाङ्मयीन नियतकालिकांतून अनुवाद प्रसिद्ध. त्यात हिदी व इंग्रजी वाङ्मयीन नियतकालिकांमधुन मोठ्या प्रमाणावर अनुवाद प्रसिद्ध.

इतर साहित्य 
* काही कथा
* उडिया कवितांची भाषांतरे
* हिंदी कथा व कवितांची भाषांतरे
* समकालीन कवितेवर समीक्षणपर लेख
* वाङ्मयीन मुलाखती व भाषणे

पुरस्कार 
* 'दिगंत' साठी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेचा सर्वोत्कृष्ट काव्यलेखनाबद्दल पुरस्कार- १९८१
* 'तरीही' साठी मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद या संसेथेचा पहिला नरहर कुरूंदकर वाङ्मय पुरस्कार -     १९८६
* 'तरीही' साठी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेचा पहिला कविवर्य कुसुमाग्रज काव्यपुरस्कार- १९८६
* 'तराही' ला महाराष्ट्र राज्य सरकारचा १९८६ - ८७ या वर्षाचा उत्कृष्ट काव्यलेखनाचा केशवसुत काव्यपुरस्कार - १९९३
* 'दिवसेंदिवस' ला बहिणाबाई प्रतिष्ठान, पुणे या संस्थेचा उत्कृष्ट काव्यलेखनासाठी कवी ना.धों. महानोर काव्यपुरस्कार - १९९३
* 'दिवसेंदिवस' ला महाराष्ट्र फौंडेशन, न्यूयाॅर्क, अमेरिका या संस्थेचा पहिला ललित वाङ्मच लेखनाचा पुरस्कार - १९९४
* शिवार प्रतिष्ठान, जिंतूर या संस्थेचा पहिला संत जनाबाई वाङ्मय पुरस्कार - २००१
* सूर्याेदय सर्वसावेशक मंडळ, जळगाव या संस्थेचा पहिला मराठी साहित्यभुषण पुरस्कार- २०१०
* मराठवाडा साहित्य परिषदेचा कविवर्य कुसुमाग्रज वाङ्मय पुरस्कार, कविता लेखनाच्या क्षेत्रातील लक्षणीय कामगिरीसाठी - २०११
* कवी हरिश्चंद्र राय साहनी - दु:खी काव्यपुरस्कार, जालना कविता लेखनाच्या क्षेत्रातील लक्षणीय कामगिरीसाठी - २०११
* साहित्यप्रेमी भगीनीमंडळ, पुणे या संस्थेचा कवितालेखनाच्या क्षेत्रातील लक्षणीय कामगिरीसाठी -२०११
* बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट आणि जैन फौंडेशन, जळगाव या संस्थांचा 'बहिणाई सर्वोत्कृष्ट लेखिका जीवनगौरव वाङ्मयपुरस्कार पुरस्कार' प्रभावशाली कवी म्हणुन - २०११
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कविवर्य भा.रा. तांबे पुरस्कार, ह्यातभर कवितेच्या क्षेत्रात केलेल्या विशेष कार्यासाठी. - २०१३
* साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट, मुंबई या संस्थेचा 'दरअसल' या प्रा. निशिकांत ठकार यांनी केलेल्या अनुवाद संग्रहाला विंदा करंदीकर राष्ट्रीय पुरस्कार.- २०१४
* 'रानगंध' हा पळसखेडे येथुन नुकताच सुरू झालेला एक लाख रुपयांचा पहिला रानगंध पुरस्कार - २०१८
* दीपा निसळ स्मृतिवाङ्मयपुरस्कार, अहमदनगर - २०१८
* गोमंत विद्या निकेतन, मडगाव, गोवा : कविवर्य कारे 'गोमंती' काव्यपुरस्कार - २०१९
* २०१९ चा साहित्य अकादमी पुरस्कार


अनुराधा पाटील
औरंगाबाद

Comments

  1. अनुराधा ताईविषयी सुंदर माहिती दिली आपण.आपल्या ब्लॉगवरुन एक उत्तुंग व्यक्तिमत्व समजले.

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts