लोककथा -1

लोककथा -1
          ती रोज धुण धुण्यासाठी मारुतीच्या देवळा समोरुन तळयाला जायची. तळयावर रोज कोणात प्रेत जळत असलेल असायच. ती मसण वाटयात जायची आणि मेलेल्या माणसाच्या नावाने ठेवलेला कणकेचा उंडा उचलुन घेऊन मसणवाटयात जळत असलेल्या सरणावर तो भाजुन घ्यायची आणि वाटेत मारुतीच्या देवळात बसुन खायची.
        अस करता करता एक दिवस गावचा मारुती तिच्या वागण्याने आश्चर्य चकित होतो आणि तोंडात बोट घालतो. सगळ गाव मंदिरात येत,बघेल तो वेगवेगळ बोलतो.प्रत्येकाच्या ना ना तरहा.मग एक जण म्हणतो, प्रत्येकाने मारुतीच्या मंदिरात जायच आणि आपल काही चुकलय का, याची कबुली दयायची.
       गावातले लहान मोठे सगळे जण देवळात जातात.देवाची माफी मागतात तरी मारुतीच्या तोंडातल बोट निघतच नाही.गाव कोडयात पडत. तेवढयात कोणीतरी म्हणत, ती सासरवाशीण आली नाही. तिला बोलवुन आणण्यात येत. ती मंदिरात जाते..हात चप्पल घेऊनच आणि देवाला म्हणते काढ ते बोट.तुला माझ्या वागण्याच नवल वाटतय!
      तिला बघितल्या देव तोंडातल बोट घाबरुन काढतो.गावाला नवल वाटत, तिची सासु तिला कुठ ठेऊ कुठ नाही करते.तिचा छळ थांबतो. ती आनंदाने राहते.
एका गावात एक दुष्ट बाई राहत होती.ती आपल्या सुनेला खुप त्रास दयायची.तिला मारायची उपाशी ठेवायची. मग रोज सुन आया बायांजवळ खुप रडायची पण कोणीच तिची मदत करत नाही. 

Comments

Popular Posts