तुला अडपडा तडपडा वाहीन

एका गावात एक गरीब जोडप राहत होत. त्यांना मुल बाळ नव्हते. गावातली प्रत्येक बाळांतीन सटवाईला चाललेली बघुन तिला पण वाटत की आपण सटवाईला जाव पण लेकरुना बाळ अन् निघाली सटवाईला म्हणुन लोक नाव ठेवतील, या भितीने ती सटवाईला जात नाही.
      एक दिवस तिची शेजारीन तिला तिच्यासोबत सटवाईला येण्याविषयी आग्रह करते आणि ती शेजारणी सोबत सटवाईला जाते. सटवाईला हात जोडते आणि म्हणते,मला मुल होऊ दे मी तुला 'अडपडा तडपडा' वाहीन. देवाला नवल वाटत की हा 'अडपडा तडपडा' आजपर्यंत आपल्याला कोणत्याही भक्ताने कसा वाहिला नाही.हा कसला असतो या उतसुकते पोटी देव तिला आर्शीवाद देतो.
        एक वर्षा नंतर ती आपल्या मुलाला घेऊन येते,मुलाला सटवाईच्या पायावर घालते. सटवाई वाट बघत असते ती,'अरप़डा तरपडया 'ची. मग ती मुलाला देवाच्या समोर झोपवते आणि कंबरेला खवलेला दोरा काडते आणि पिंडरीवर त्या दोरयाला वळुन घेते.मग दोरा देवाच्या समोर ठेवते.दोरयाला घट्ट पिळ बसलेली असते त्यामुळे दोरा जमिनीवर टाकल्यानंतर वाकडा तिकडा तडफडु लागतो. त्याचा उटलेला तरपडा देव कौतुुकाने बघतो.तिच्या चतुराईचे देवाला कौतुक वाटते आणि देव प्रसन्न होऊन सदैव सुखी राहण्याचा आर्शीवाद तिला देतो.

Comments

Post a Comment

Popular Posts