राजशेखर सोलापुरे



राजशेखर शशिकांत सोलापुरे यांचा जन्म मराठवाड्यातील लातूर येथे दि. १९ जुन १९८० मध्ये झाला. त्यांनी एम.ए. (राज्यशास्त्र), एम. ए. (इतिहास), बी.एड्., बी.जे., एम.फिल., पीएच.डी.(राज्यशास्त्र) पर्यंतचे शिक्षण घेतले. 'महात्मा बसवेश्वरांच्या राजकीय विचार व कार्याची प्रासंगिकता : एक चिकित्सक अभ्यास' या विषयावर त्यांनी पीएच.डी. पदवीसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड कडे शोधप्रबंध सादर केला. मध्ययुगीन भारतीय राजकीय विचार परंपरा व आधुनिक राजकीय विचारपरंपरेचा तौलनिक अभ्यास त्यांनी केला आहे. भारतीय राज्यघटनेच्या तत्त्वज्ञानाचे ते अभ्यासक आहेत. भाषण कलेचे भाष्यकार तथा प्रागतिक विचारधारेचे समर्थक असणारे ते व्यासंगी वक्ते व लेखक आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मीती मंडळ, मुंबईच्या सदस्यपदी महाराष्ट्र शासनाने दि.०५/०८/२०१५ रोजी त्यांची नियुक्ती केली.

  प्रकाशित साहित्य
 १) 'प्रभावी सूत्रसंचालनाची कला' (विद्याभारती प्रकाशन, लातूर - २००८)
 २) 'उत्कृष्ट भाषण कला' (विद्याभारती प्रकाशन, लातूर - २००९)
 ३) 'भारतीय शासन आणि राजकारण' (अरूणा प्रकाशन, लातूर - २००९)
 ४) 'ग्रामोद्धाराचे प्रणेते राष्ट्रसंत तुकडोजी' (विद्याभारती प्रकाशन, लातूर - २०१०)
 ५) 'सामाजिक कायदा' (अरूणा प्रकाशन, लातूर - २०१०)
 ६) 'महाराष्ट्र शासन आणि राजकारण', (अरूणा प्रकाशन, लातूर - २०१०)
 ७) 'लिंगायत : एक स्वतंत्र धर्म', (प्रवर्तन पब्लिकेशन, लातूर -२०१३)
 ८) 'महाराष्ट्रातील शासन व्यवस्था आणि राजकारण' (अरूणा प्रकाशन, लातूर - २०१३)
 ९) 'महान विचारांच्या प्रकाशात' (अरूणा प्रकाशन, लातूर - २०१४)
 १०) 'मानवी हक्क आणि समाज' (अरूणा प्रकाशन, लातूर - २०१४)
 ११) 'आधुनिकतेचे अग्रदूत : महात्मा बसवेश्वर' (अरूणा प्रकाशन, लातूर - २०१६)
 १२) 'लोकशाही आणि निवडणूक प्रक्रिया' (अरूणा प्रकाशन, लातूर -२०१७)
 १३) 'आधुनिक राजकीय विश्लेषण' (अरूणा प्रकाशन, लातूर - २०१९)
 १४) 'समाजसुधारक सर्वसमावेशक' (अरूणा प्रकाशन, लातूर - २०१९)
 १५) 'राजकीय संकल्पनांचा परिचय' (सुमन प्रकाशन, लातूर - २०१९)
१६)  'प्रतिभावंत लोकलेखक  अण्णाभाऊ साठे' (विद्याभारती प्रकाशन, लातूर - २०२०)

  संपादित ग्रंथ
 १) 'बसवेश्वरी वचन साहित्य' (२००७)
 २) 'महिला विकास : प्रश्न - पैलु - प्रयास' (अरूणा प्रकाशन, लातूर - २०१२)
 ३) 'परिवर्तनवादी चळवळी' (अरूणा प्रकाशन, लातूर - २०१४)
 ४) 'राजकीय सिद्धांताची रुपरेषा' (अरूणा प्रकाशन, लातूर - २०१४)
 ५) 'मानवी हक्क' (२०१४)

  संशोधन पत्रिकेतील संपादन
* 'शोध संपदा' या संशोधन त्रैमासिकाचे २०११ पासून संपादक म्हणुन संपादनाचे कार्य.
* स्तंभ लेखन दै. सकाळ मध्ये 'चौफेर' पुरवणीत 'सत्य आणि संभ्रम' या शिर्षकाने २०१६ या वर्षात सदर लेखन. * दै. एकमत मध्ये 'सप्तरंग' पुरवणीत 'बदल' या शिर्षकाने २०१२ मध्ये सदर लेखन.
* 'मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा' (मुंबई) या पाक्षिकात 'मराठवाडा डायरी' या शिर्षकाने २०१०-२०११ मध्ये         सदर लेखन.
* दै. सोलापूर 'तरूण भारत' या वृत्तपत्रात 'युवाभरारी' या साप्ताहिक पुरवणीचे मुख्य समन्वयक म्हणुन कार्य     व लेखन.

व्याख्याते
महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यात १९९८ पासून तीन हजारांपेक्षा जास्त व्याख्याने दिली आहेत.
व्याख्यानाचे विषय -  'सांगा कसं जगायचं', 'समतेचे प्रणेते महात्मा बसवेश्वर', 'शिवराय समजुन घेताना', 'दु:खितांचे दु:ख जावो', 'भान हरवलेली माणसं अन् जाण हरवलेली नाती', 'परिवर्तनाची परंपरा : बुद्ध, बसवण्णा, बाबासाहेब','महाभारताकडे कसे पहाल', 'वेदना जाणावया जागवु संवेदना','लोकशाहीसाठीचे धोके व धोक्याची लोकशाही', 'गोष्ट हसणाऱ्या माणसांची', 'नव्या युगाचे दान मागू', 'संकटांचा सामना करणाऱ्या माणसांच्या गोष्टी', 'इतिहासाची पाने चाळताना', 'तरूण आहात हेच खूप आहे', 'समान मानव माना स्त्रीला'

प्राप्त पुरस्कार
* महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रीय सेवा योजना 'उत्कृष्ट स्वयंसेवक' राज्य पुरस्कार (इ.स. २००० - २००१)
* नेहरु युवा केंद्र, लातूरचा 'जिल्हा युवा पुरस्कार' (इ.स. २००१ - २००२)
* महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथील उत्कृष्ट वक्ता पुरस्कार' (इ.स. १९९९-२०००)
* कै. देविदास जमदाडे विचारमंच, लातूरचा 'युवा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार' (२००७)
* स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषद, लातूरचा 'स्वाभिमानी गाैरव पुरस्कार' (२०१०)
* विलासराव देशमुख सार्वजनिक वाचनालय, चांडेश्वर, ता.जि.लातूरचा 'साहित्यरत्न पुरस्कार' (२०१०)
* अखिल भारतीय मराठी वीरशैव साहित्य मंडळ, नागपूरचा 'डॉ. सूर्यकांत घुगरे उत्कृष्ट संशोधक पुरस्कार'           (२०१३)
* साईनाथ सांस्कृतिक युवा मंच, लातूरच्या वतीने 'स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार' (२०१४)
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी, लातूरचा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार'- 'लिंगायत : एक स्वतंत्र धर्म' या पुस्तकासाठी मिळाला आहे. (२०१२-२०१३)
* चला कवितेच्या बनात, उदगीरचा साहित्य साधना २०१५ हा पुरस्कार 'मानवी हक्क आणि समाज' या पुस्तकासाठी मिळाला आहे.
* अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचा 'हुतात्मा छत्रपती चाैथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार' 'परिवर्तनवादी चळवळी' या संपादित ग्रंथाला मिळाला.
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी, लातूरचा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार' 'मानवी हक्क आणि समाज' या पुस्तकास मिळाला आहे.(२०१५)
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी, लातूरचा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार' 'आधुनिकतेचे अग्रदूत महात्मा बसवेश्वर' या पुस्तकास मिळाला आहे.(२०१६)
* महात्मा बसवेश्वर समता परिषद, नांदेडचा 'महात्मा बसवेश्वर समता गौरव पुरस्कार' मिळाला आहे. (२०१७) * लातूर महानगरपालिकेचा 'डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक पुरस्कार' मिळाला आहे. (२०१९)
* समर्पित  बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, लातूर कडून राज्यस्तरीय समर्पित 'साहित्यिक पुरस्कार' (२०१९)

डॉ. राजशेखर सोलापुरे,
संत ज्ञानेश्वर नगर, राजीव गांधी चौकाजवळ,
रिंगरोड, लातूर - ४१३५३१
Email -rajshekhar.solapure@gmail.com

Comments

Popular Posts