जनार्दन माधवराव वाघमारे

डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे : (११ नोव्हेंबर १९३४) 
         इंग्रजी साहित्याचे जाणकार प्राध्यापक, निग्रो साहित्याचे भाष्यकार, दलित पुरोगामी साहित्य चळवळीचे अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ आणि कृतीशील विचारवेत म्हणून परिचित आहेत. जनार्दन वाघमारे यांचा जन्म औसा तालुक्यातील कौठा या गावी झाला. शिक्षण कौठा, लातूर, हैद्राबाद, औरंगाबाद येथे. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, मोडी भाषेवर प्रभूत्व. ‘The Problem of Identity in the Postwar American Negro Novel’ या विषयात डॉ. म.ना. वानखडे यांच्या मार्गदर्शनात पीएच.डी. पदवीसाठी मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे १९८० मध्ये सादर केला. दलित चळवळी, ग्रामीण साहित्य चळवळीत सक्रीय सहभाग यातूनच साहित्य लेखनाची वाटचाल. विद्यार्थीदशेत शाळेतील शिक्षकांनी एखाद्या विषयावर लिहायला लावलेल्या निबंधातून लेखनाविषयीची गोडी निर्माण झाली व लेखनाकडे वळले. सुरुवातील कविता, समीक्षा यातून ललित लेखनाची वाटचाल. वाड्.मयीन जडणघडणीवर वि.स.खांडेकर, ना.सी.फडके, प्र.के.अत्रे, विल्यम शेक्सपिअर, शेली या लेखकांच्या समाजवादी विचारांचा प्रभाव आहे. 

नोकरी :
      नोकरीची सुरूवात (१९५९ - ६२) शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथे इंग्रजी विषयाचा अधिव्याख्याता म्हणून केली. त्यानंतर (१९६२-६४) डॉ. आंबेडकर वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद, (१९६४ -७०) देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद इंग्रजी विषयाचे अध्यापक म्हणुन काम केले. (१९७० -१९९४) राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे प्राचार्य म्हणून काम केले. (१९९४ -९९) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे कुलगुरु म्हणुन काम. (२००१ -२००६) नगरपरिषद, लातूर येथे नगराध्यक्ष म्हणून काम केले. राज्यसभेचे सदस्य म्हणून काम केले (२००८ - २०१४). (१९९९ - २००४) महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे सदस्य. खासदार, कुलगुरु, प्राचार्य, प्राध्यापक अशा अनेक पदांवर काम केले. 

प्रकाशित साहित्य :
* ‘अमेरिकन नीग्रो : साहित्य आणि संस्कृती’ (१९७८) हा पहिला अमेरिकन नीग्रोंचे विवेचन करणारा ग्रंथ. 
* ‘महाराष्ट्रातील राजकारण व समाजकारण’ (१९८०)
* ‘हाक आणि आक्रोश’ (१९८४) 
* ‘शिक्षण : समाज परिवर्तन व राष्ट्रीय विकास’ (१९८४) 
* ‘प्राथमिक शिक्षण : यशापयश आणि भवितव्य’ (१९८२)
* ‘आजचे शिक्षण : स्वप्न आणि वास्तव’ (१९९३) 
* ‘साहित्यचिंतन’ (१९९६) 
* ‘चिंतन एका कुलगुरुचे’ (१९९९)
* ‘चिंतनयात्रा’ (२००४) 
* ‘परिवर्तन : संकल्पना, वेध आणि वास्तव’ (१९९९) 
* ‘बदलते शिक्षण : स्वरुप आणि समस्या’ (२००९)
* ‘विचारमुद्रा’ (२०११)
* ‘लोकशाही आणि शिक्षण’ (२०१२)
* ‘दलित साहित्याची वैचारिक पार्श्वभूमी’ (२०१३) 
* ‘संपादन : कर्तृत्वाचा सह्याद्री’ (२०१३)
* ‘विमर्श’ (२०१५) 
* ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांतिकारक शैक्षणिक विचार आणि कार्य’ (२०१५)
* ‘माझे मूळ : माझे कूळ’ (२०१५)
* ‘ स्वावतंत्र्य : एक चिंतन’(२०१६)
* ‘शरद पवार : व्यक्तित्व, कर्तृत्व आणि नेतृत्व’ (२०१६)
* ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जातिअंताचा लढा’ (१९९०) 
* ‘ज्ञान - विज्ञानाच्या देशात’ (प्रवासवर्णन २००५)
* ‘बखर एका खेड्याची’ (कादंबरी २००५)
* ‘मूठभर माती’ (आत्मचरित्रात्मक लेखन - २००६)
* ‘चिंतन एका नगराध्यक्षाचे’ ( आत्मचरित्रात्मक लेखन - २००६)
* ‘जीवनरेखा’ ( व्यक्तिचित्रण - २०००)
* ‘व्याक्तिवलये’ (व्यक्तिचित्रण - २००५)
* ‘स्वाामी दयानंद सरस्वती : विचार, कार्य व कर्तृत्व’ (व्यक्तिचित्रण - २०१०)
* ‘व्यक्तित्व आणि कर्तृत्व’ (व्यक्तिचित्रण - २०१५) 
* ‘मंथन’ (ललितलेखसंग्रह - २०१०)
* ‘मातीवरच्या ओळी’ (ललितलेखसंग्रह - २०१०) 
* ‘सहजीवन’ (ललितलेखसंग्रह - २०१२) .  
* ‘सुख की पीडा’ (काव्य - २०१२) 
* ‘ध्यास परिवर्तनाचा’ ( गौरवग्रंथ - २०११)  
* ‘संवाद’ ( आकाशवाणीवरचा भाषण संग्रह - २००६) 

अनुवादित ग्रंथ :
* ‘समाज परिवर्तन कि दिशाएँ’ (१९९५)
* ‘एक शिक्षाविद् का चिंतन’ (१९९९)
* ‘महर्षि दयानन्द सरस्वती : विचार, कार्य और कृतित्व’ (२०१२) 
* ‘दलित साहित्य की वैचारिक पृष्ठभूमि’ (२०१३)
* ‘ साहित्यचिंतन’ (२०१६) 

इंग्रजी ग्रंथ :
* ‘The Quest for Black Identity’ (२००२) 
* ‘The Horizons And Beyond’ (२००६)
* ‘Sharad Pawar : A Profile in Leadership’ (२००९)
* ‘My Days In Parliament’ (२०१७) 

            अशा वेगवेगळ्या विषयांवर लेखन केले. यातून विविध विषयांवर भाष्य केलेले आहे. शिक्षाधिकाराचा कायदा हा लोकशाहीच्या दृढीकरणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तो ज्ञानाधिष्ठित समावेशी समाजाचा पाया ठरणार आहे. ज्ञानकेंद्रित समाजाची निर्मिती ही प्रबुद्ध अशा लोकशाहीतच शक्य आहे आणि नेमकी हीच मांडणी ते करतात. साहित्य, व्यक्तीविषयक, व्यापक सामाजिक हिताची भूमिका आणि त्यासाठीची मूल्यात्मकता या दोन गोष्टी त्यांच्या विचार विश्वाच्या केंद्रस्थानी आहेत. म्हणून वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या निमित्ताने लिहिलेले हे लेख आहेत. ‘ज्ञान - विज्ञानाच्या देशात’ (२००५) हे प्रवासवर्णन इंग्लंड, अमेरिका व कॅनडाच्या शैक्षणिक दौर्यािवर आधारलेले आहे. यात यादेशांच्या शिक्षण पद्धतीबरोबरच त्याठिकाणच्या सामाजिक व सांस्कृतिक संस्था, समाज जीवन व त्यातील गुंतागुंतीचे प्रश्नज यांचा अभ्यास व त्यासंबंधीची निरीक्षणे लेखकाने नोंदविली आहेत. ‘बखर एका खेड्याची’ (२००५) ही कादंबरी म्हणजे कौठा याखेड्याची बखर आहे. कादंबरीतील निवेदकाच्या मनात प्रश्न येतो की कौठा हे गाव जर तीनशे साडेतीनशे वर्षापासून अस्तित्वात आहे तर त्याला इतिहास आहे की नाही ? हा निवेदकाच्या मनातील प्रश्न आहे. माणसं आहेत आणि काळ जातोच आहे म्हणजे इतिहास जमा होत जाणारच ही त्याची धारणा आहे. इतिहासाबद्दल एक नवी जाणीव येथे लेखक व्यक्त करीत आहे. एक सर्वसाधारण खेडे हेच ह्या कादंबरीचे नायकत्व स्वीकारते. त्याच्या सर्वसाधारण अस्तित्वाचा, उभारणीचा, पडझडीचा आणि उद्धवस्ततेचा हा इतिहास आहे. गतकालीन घटनांना केंद्रस्थानी ठेवून येथे एक स्मरणचिंतन व्यक्त झाले आहे. ‘मूठभर माती’ (२००६), ‘चिंतन एका नगराध्यक्षाचे’ (२००६) या ग्रंथातून केवळ आत्मचरित्रच नव्हेत तर नवमहाराष्ट्र निर्मिती नंतर मराठवाड्यातील ज्ञान विज्ञान शाखा, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक चढ उतारांचे सक्रिय साक्षीदार असलेल्या कुशल प्रशासकाच्या जीवनाचा, जडणघडणीचा आलेख आहे. 

Comments

Popular Posts