रा. रं. बोराडे

रावसाहेब रंगराव बोराडे :

     रा. रं. बोराडे यांचा जन्म ता. जिल्हा, लातूर येशील काटगाव या गावी झाला. रा.रं. बोराडे यांचे इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण खाजगी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली काटगाव येथे झाले. पाचवीसाठी त्यांना बार्शीला यावे लागले. बार्शीच्या सुलाखे हायस्कूलमध्ये त्यांचे १०वीपर्यंतचे शिक्षण झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते सोलापूरला गेले. सोलापुरातील दयानंद महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले व पदव्युत्तर शिक्षणासाठी ते औरंगाबादला आले. तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी मराठीमध्ये एम.ए. केले.

१९६३ साली रा.रं. बोराडे हे विनायकराव पाटील यांनी स्थापन केलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वैजापूर येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९७१पासून पुढे काही काळ ते त्या कॉलेजचे प्राचार्य होते. आपल्या कर्तृत्वाने वैजापूरसारख्या छोट्या गावाला त्यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक नकाशावर आणले. नंतर ते नामांकित समजल्या जाणाऱ्या औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य बनले.श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी येथे प्राचार्य राहिलेले आहेत. २००० साली त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली.

रा. रं. बोराडे यांचे प्रकाशित साहित्य :

कादंबऱ्या :

  • पाचोळा, मौज प्रकाशन, मुंबई, १९९५
  • सावट, मेहता पब्लिशिंग हाऊस, मुंबई, १९८७
  • चारापाणी, मेहता पब्लिशिंग हाऊस, मुंबई, १९९०
  • महानगाव, मोरया प्रकाशन, डोंबिवली, १९९३
  • आमदार सौभाग्यवती, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, १९९५
  • रहाटपाळणा, १९९६

कथासंग्रह (एकूण १५):

  • पेरणी, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे, १९६२
  • ताळमेळ, व्हिनस प्रकाशन, पुणे, १९६६
  • मळणी, मेहता पब्लिशिंग, पुणे, १९८३
  • वाळवण, व्हिनस प्रकाशन, पुणे, १९७६
  • राखण, रोही प्रकाशन, पुणे, १९७७
  • गोंधळ, श्री. विशाखा प्रकाशन, पुणे, १९७८
  • माळरान, श्री. विशाखा प्रकाशन, पुणे, १९८१
  • बोळवण,  श्री. विशाखा प्रकाशन, पुणे, १९८१
  • वरात,  श्री. विशाखा प्रकाशन, पुणे, १९८२
  • फजितगाडा,  श्री. विशाखा प्रकाशन, पुणे, १९८३
  • खोळंबा,  श्री. विशाखा प्रकाशन, पुणे, १९८३
  • बुरूज,  श्री. विशाखा प्रकाशन, पुणे, १९८५
  • नातीगोती, लोकवाङ्मय, मुंबई, १९८५
  • हेलकावे, साहित्य सेवा, औरंगाबाद, १९९०
  • कणसं आणि कडबा, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, १९९४

नाटके :

  • पिकलं पान, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९७९
  • विहिर, परीमल प्रकाशन, औरंगाबाद, १९८२
  • आज नाटक व्हनार न्हाई, अक्षर प्रकाशन, औरंगाबाद, १९७८
  • पाच ग्रामीण नाटिका, साकेत प्रकाशन, औरंगाबाद,१९८७
  • आमदार सौभाग्यवती (याच नावाच्या बोराडे यांच्या कादंबरीचे श्रीनिवास जोशी यांनी केलेले नाट्यरूपांतर)
  • आम्ही लेकी कष्टकऱ्यांच्या, (नाटिका) साकेत प्रकाशन, औरंगाबाद

वगनाट्य :

  • कशात काय अन् फाटक्यात पाय, अभिनव प्रकाशन, मुंबई.
  • हसेल गं बाई फसले, सन्मित्र प्रकाशन, कोल्हापूर

समीक्षा : 

  • ग्रामीण साहित्य, साकेत प्रकाशन, औरंगाबद, १९९२

बालसाहित्य :

  • हरवलेली शाळा (बालकथासंग्रह)
  • शिका तुम्ही हो शिका ( बालकादंबरी), साकेत प्रकाशन, औरंगाबाद, १९९३
उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे राज्य पुरस्कार :
  • मळणी (कथासंग्रह)
  • पाचोळा (कादंबरी)
  • पाच ग्रामीण नाटिका (नाटिकासंग्रह)
वाङ्मयीन सेवा गौरव पुरस्कार :
  • 'पाचोळा' या कादंबरीला १९८८ - ८९ या वर्षाचा कै. भैरू रतन दमाणी साहित्य पुरस्कार.
  • 'चारापाणी' या कादंबरीला १९९० चा मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद या साहित्य संस्थेच्या के. नरहर कुरुंदकर पुरस्कर.
  • वाङ्मयीन क्षेत्रातील कर्तव्याबद्दलचा स्वातंत्र्य सैनिक विनायकराव चारठाणकर प्रतिष्ठानचा सेवागौरव पुरस्कार.
सन्मान :
  • मार्च १९८० मध्ये कोपरगाव येथे झालेल्या नगर जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • ऑक्टोबर १९८१ मध्ये वहिरगाव (ता. कन्नड) येथे झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • फेब्रुवारी १९८६ मध्ये धर्माबाद येथे झालेल्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने जून १९८९ मध्ये हिंगोली येथे झालेल्या १७ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • जामखेड येथे डिसेंबर १९९१ मध्ये झालेल्या दुसऱ्या मध्य महाराष्ट्र ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड.
नियुक्ती :
  • १९८१ के १९८३ तसेच १९८६ ते १९८८ या कालावधीत आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या कार्यक्रम सल्लागार मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती. 
  • १९८६ ते १९८९ या कालावधीत महाराष्ट्र पातळीवरील ग्रामीण साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती.
  • नोव्हेंबर १९८८ साली स्थापन झालेल्या दलित आदिवासी ग्रामीण संयुक्त महासभेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती.
  • १९९० ते १९९३ या कालावधीत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती.
  • 'पाचोळा' या कादंबरीचा हिंदी भाषेत पुस्तक रूपाने अनुवाद प्रकाशित.
  • मराठवाडा विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात 'पाचोळा',  'मळणी', 'नातीगोती', 'वानवळा', 'आमदार सौभाग्यवती' या पुस्तकांचा समावेश.
  • शिवाजी विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात 'पाचोळा' व 'मळणी' या पुस्तकांचा समावेश.
  • मुंबई विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात 'मळणी' या कथासंग्रहाचा समावेश.
  • पुणे विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात 'राखण' या कथासंग्रहाचा व 'पाचोळा' या कादंबरीचा समावेश.
  • उस्मानिया विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात 'पाचोळा' या कादंबरीचा समावेश. 
नाट्यप्रयोग :
  • 'पिकलं पान' या  नाटकाचे मराठी व्यावसायिक रंगभूमीवर प्रयोग.
  • 'कशात काय अन् फाटक्यात पाय' तसेच 'हसले ग बाई फसले' या वगाचे हौशी नाट्यसंस्थांच्या वतीने प्रयोग.
  • 'विहीर' या नाटकाचे राज्य नाट्यस्पर्धेत प्रयोग.
  • 'आमदार सौभाग्यवती' या कादंबरीवरील नाटकाचे पुणे येथील रंगालय या नाट्यसंस्थेच्या वतीने व्यावसायिक रंगभूमीवर प्रयोग सुरू असुन आतापर्यंत चारशेच्या आसपास प्रयोग.

Comments

Popular Posts