भारत काळे - मराठी कादंबरीकार


भारत काळे : (जन्म - ८ जुलै  १९६८)

                                        

    आधुनिक मराठीतील कादंबरीकार व समीक्षक. जोडपरळी, ता. जि. परभणी येथे शेतकरी कुटुंबात यांचा जन्म. 'ऐसे कुणबी भुपाळ' (२००१) ही पहिली कादंबरी. यातुन मानवी मनातील आदिमकाळापासून चालत आलेला स्वामीत्वाचा संघर्ष मांडते. या कादंबरीच्या मांडणीसाठी निवडलेला घटक हा ग्रामीण आहे. हे कथानक कोणत्याही पाश्वर्वभूमी वर घडु शकते.यात मानवी मानाचे वर्तनशास्त्र अधोरेखित करण्‍याचा प्रयत्‍न लेखकाने केलेला आहे. माणसाच्‍या मनातील प्रश्‍न आणि त्‍याच्‍याशी निगडीत विधाने यामुळे त्‍यांच्‍या भूमिका ठरत जातात. हा विचार या कादंबरीतून मांडलेला आहे. जुन्‍या धारणांची पडझड आणि नव्‍या बदलात होणारी तडफड यांचे अत्‍यंत अप्रतिम जिव्‍हाळ्याने केलेले चित्रण कादंबरीत आहे. वरवर ऐपतदार आणि जमीनदार व म्‍हणूनच तालेवार वाटणाऱ्या शेतक-यांच्‍या जगण्‍यातल्‍या वेदना मांडतेवेळी खानदानी मराठी कुटुंबातील स्त्रिया आणि त्‍यांचे परस्‍परसंबंध, मालक आणि गडी यांचे संबंध, गावातलं राजकारण आणि निवडणुका, चढाओढी, तडातडी, भावाभावातील वैर, मानमरातबाच्‍या गोष्‍टी, म्‍हातारपणी शेतक-याचं थकलेल्‍या म्‍हाता-या बैलासारखं निकामी म्‍हणून दुर्लक्षित होणे अशा अनेक गोष्‍टी कादंबरीमधून येतात. 'दीक्षा' : (२००७) या कथासंग्रहात येणाऱ्या कथा अनेक वेगवेगळे विषय घेऊन येतात. स्त्रियांची होणारी ससेहोलपट, नातेसंबंधांची गुंतागुंत, बदललेल्‍या गावाचे चित्रण, राजकीय लोकांचे कलाकेंद्रावरील वर्तन, महानुभाव संप्रदायातील लोकांचे जगणे या कथांमधुन मांडले आहे. या कथा बदलते खेडे व जीवन व्‍यवहार यांची मांडणी करतात. भारत काळे हे काळाचा वेध घेऊन लेखण करणारे कादंबरीकार आहेत. त्‍यांनी केलेली मानसशास्‍त्रीय अंगाची मांडणी ही त्‍यांच्‍या ठिकाणच्‍या वेगळेपणाची ओळख करुन देणारी आहे. मानवी मनाचे अनेक धागे वाचकांच्‍या समोर आपल्‍या साहित्‍यातून त्‍यांनी मांडलेले आहेत.

Comments

Popular Posts