दिनकर दाभाडे


दिनकर दाभाडे हे मराठीतील कादंबरीकार आहेत.  वैदर्भी भाषेचा लहेजा त्यांच्या साहित्याला प्राप्त झाला आहे. विदर्भातील लोकांचे प्रश्न, त्यांची जीवनशैली यांचे बारकावे साहित्यातुन मांडले आहेत. त्यांचा जन्म दि. २३/०२/१९६५ मध्ये  सावरगाव, ता. जळगाव जामोद,  जि. बुलढाणा. येथे झाला. 'बिलामत' या पहिल्याच कादंबरीमुळे  मराठी साहित्यात स्वत:ची ओळख त्यांनी निर्माण केली.
* साहित्याच्या आवडीमुळे त्यांनी पुर्णवेळ लेखन करण्याचा व शेतकरी संघटनेचे काम करण्याचा निर्णय               घेतला  व  २००२ मध्ये BSNL मधील नोकरीचा त्यांनी  राजीनामा दिला आणि पुर्णवेळ संघटनेचे काम ते           करु  लागले.
* वाशीम अकोला बुलढाणा विधानपरिषद निवडणूक रिंगणात उतरले.  दोन वेळा zp निवडणूक रिंगणात.
* शबद्दवेध मासिकात 17 वर्ष काम.
* अखिल भारतीय दलीत आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन चे आयोजन. शेतकरी संघटना मध्ये कार्यरत

कौटुंबिक माहिती :
पत्नी - सुमन
दोन मुली - नूपुर, वीणा

प्रकाशित साहित्य
* बिलामत (ग्रंथाली प्रकाशन, मुंबई. १९९४)
* गयपातं (साकेत प्रकाशन, औरंगाबाद. २००५)
* व्हाया सावरगाव खुर्द (पेपलवॉल प्रकाशन, मुंबई २०१६)
* पाय रव (आगामी)

पुरस्कार
बिरसा मुंडा पुरस्कार
कृष्णराव भालेकर पुरस्कार
दाते फाऊंडेशन चा बाबा पद्मनजी पुरस्कार,
शकुंतला देवी पोटे पुरस्कार



संपर्क -
दिनकर दाभाडे
मु. पो. सावरगाव
ता. जळगाव जामोद,  जि.  बुलढाणा.

Comments

  1. चांगलं उपक्रम... सुंदर मांडणी...एक दोन वेळा लेखकाशी फोनवरती बोलणं झालं ... आकर्षक व्यक्तिमत्त्व.

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts