डॉ. भि.शि. स्वामी


डॉ. भिमा शिवय्या स्वामी (१५ ऑक्टोंबर १९४३)
वीरशैव संत साहित्याचे अभ्यासक व कादंबरीकार. जन्म सोनसांगवी ता. केज, जि. बीड येथे झाला. प्राथमिक शिक्षण सोनेसांगवी ता. केज, जि. बीड या जन्मगावी. हायस्कुलचे शिक्षण बार्शी येथे सिल्व्हर ज्युबिली हायस्कुल मध्ये झाले. पी. यु. सी., एस. पी. कॉलेज पुणे येथे झाले. बी. एस्सी. शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथे झाले. पुढे बहिस्त विद्यार्थी म्हणून बी. ए. व एम. ए. चे शिक्षण मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद येथे पुर्ण केले. डॉ. यू. म. पठाण यांच्या मार्गदर्शना अंतर्गत मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद येथे पीएच.डी. साठी 'लक्ष्मण महाराज : व्यक्ती आणि वाड्. मय' या विषयावर संशोधन केले. महाविद्यालयात शिक्षण घेते वेळी १९६६ ते १९७४ पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात अनुरेखक म्हणून काम केले. १९७४ ते २००३ या कालावधीत श्री कुमारस्वामी महाविद्यालय, औसा येथे अध्यापक म्हणून काम केले. २००३ मध्ये सेवानिवृत्त झाले.

प्रकाशित साहित्य :
कथासंग्रह : 
* दिशा (१९८०)

कादंबरी : 
* गणुराया (२०००)
* प्रजा (२०११)

 संशोधन :
* लक्ष्मण महाराज :व्यक्ती आणि वाड्. मय (१९९४)
* मन्मथस्वामींची अभंगवाणी (२००३)

संपादन :
* लक्ष्मण महाराज विरचित शिवभक्त कथा (१९९६)


भिमा शिवय्या स्वामी
पुणे

Comments

Popular Posts