सुरेंद्र पाटील


सुरेंद्र रावसाहेब पाटील : (जन्म : २१ डिसेंबर १९६३)
सुरेंद्र पाटील हे  मराठीतील एक महत्त्वाचे कादंबरीकार आहेत. त्यांचा जन्म लामजना, ता.औसा जि.लातूर येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. १९९३ च्या भुकंपाचा मोठा फटका लामजना या गावाला बसला. त्या घटनेचे पडसाद सुरेंद्र पाटील यांच्या आरंभीच्या कथासाहित्यातुन दिसतात. पाटील यांनी ए.टी.डी., जी.डी.आर्ट (पेंटिंग), ए.एम.-लातूर, मुंबई - सांगली येथे कलाशिक्षण घेतले  आहे.


* कौटुंबिक माहिती - पत्नी सौ.ओमदेवी व मुले शुभदा , वृषभ , धनश्री

* सुरेंद्र पाटील हे १९९० पासून मा.दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय, औराद शहाजानी येथे 'रेखाकला व रंगकाम' विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

* पाटील यांनी रेखाटनकार, चित्रकार आणि लेखक म्हणुन स्वत: ची ओळख निर्माण केली आहे. १९८८ मध्ये सांगलीच्या कलाविश्व महाविद्यालयात 'कोरडी पॅलेट' या एकांकीकेपासून लेखनाची सुरुवात. १९९३ च्या विनाशकारी भूकंपाचा परिणाम लेखनावर झाला. महाविद्यालयात कवी फ. म. शहाजिंदे यांच्या सान्निध्यात लेखनाची आवड गंभीरतेत बदलली. १९९३ चा भूकंप, नापिकी, सततचा दुष्काळ  हे लेखकातुन मांडले.  राजन गवस, भास्कर चंदनशीव यासारख्या लेखकांचे साहित्य  तसेच निवडक प्रादेशिक साहित्य वाचनाने  लेखन बदलत गेले.  गावमातीतला उघडा माणूस साहित्यात मांडला. लामजना व औराद शहाजानी परिसरातील  बोली, शेतकरी जीवन, सुशिक्षित तरुणाचे भंगलेपण मांडायचा प्रयत्न पाटील यांच्या लेखनिने केला.  अक्षरलिपी, वाघूर, मुराळी, सामना, प्रतिभा, सकाळ,पुण्यनगरी आदी अनेक दिवाळी अंकातून कथा, व्यक्तिचित्रे प्रकाशित.

 प्रकाशित साहित्य -
कथासंग्रह 
* आंतरभेगा- भावलावण्य प्रकाशन, औराद शहाजानी. २००१

कादंबरी - 
* चिखलवाटा- साकेत प्रकाशन, औरंगाबाद. २००८
* झुलीच्या खाली- मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई. २०१६

पुरस्कार -
* सहकार महर्षी साहित्य पुरस्कार, सोलापूर
* सावित्रीबाई जोशी साहित्य पुरस्कार, औरंगाबाद
* भि. ग. रोहमारे साहित्य पुरस्कार, कोपरगाव


इतर -
* आंतरभेगातील'बे एके बे' कथेचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा  विद्यापीठ , औरंगाबाद  बी ए/बी               कॉम/    बी एस्सी प्रथम वर्ष (मराठी द्वितीय भाषा) अभ्यासक्रमात समावेश -२००९
* गुलबर्गा विद्यापीठ, गुलबर्गा (बी कॉम द्वितीय वर्ष) 'चिखलवाटा' या कादंबरीचा अभ्यासक्रमात                       समावेश.-२००९
* झुलीच्या खाली कादंबरीची लक्षवेधी कादंबरी म्हणून ललित कडून दखल -२०१६
* ललित, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, प्रतिष्ठान, मुराळी या अंकातुन लेखन.
* प्रतिष्ठान या नियतकालिकातुन चित्रकारांचा परिचय करुन देत आहेत.
* राजन गवस संपादित 'मुराळी' २०१९ या दिवाळी अंकासाठी रेखाटने.
* महाराष्ट्र टाईम्स, ललित, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, सक्षम समीक्षा,भाव-अनुबंध, प्रतिष्ठान इ.अनेक साहित्य पत्रिकेमधू अनेक समीक्षकानी कादंबरी लेखनाची स्वतंत्र दखल घेतली आहे.
* सुरेंद्र पाटील यांच्या साहित्यावर (कादंबरी) अनेकांनी एम. फिल., पीएच डी.,चे संशोधन पुर्ण केले आहे.
* सुरेंद्र  पाटील यांच्या निवडक कथांचा हिंदीमध्ये अनुवाद झाला आहे.

आगामी -
* गावमातीच्या गोष्टी (व्यक्तिचित्रण)
* संशयाष्टक (कादंबरी)


▪ सुरेंद्र  रावसाहेब पाटील
मु. पो. लामजना ता.औसा जि. लातूर-४१३५१६
▪surendrapatil121@gmail.com

Comments

Post a Comment

Popular Posts