शेषराव मोहिते




डॉ. शेषराव माधवराव मोहिते : (जन्म १ ऑगस्ट १९५६)

ग्रामीण कादंबरीकार आणि शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते. शेषराव मोहिते यांचा जन्म ता. उमरगा, जि. उस्मानाबाद येथिल व्हंताळ येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. सद्या ते लातूर येथे राहतात. त्यांनी शालेय शिक्षण व्हंंताळ, बलसूर, परभणी येथे झाले. 'कृषी विस्तार' या विषयासाठी डॉ. जी. जी. नांदापूरकर यांच्या मार्गदर्शनात पीएच.डी. ही पदवी मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे १९८८ मध्यें पूर्ण केली.

* विद्यार्थी असताना जयप्रकाश नारायण यांच्या 'छात्र युवा संघर्ष वाहिनीचे' संयोजक म्हणून (१९८० - ८१) जबाबदारी सांभाळली. १९८० पासून शेतकरी चळवळीत सक्रीय. शेतकरी चळवळ, जेम्सर हेरियेट, अलेक्स८ हॅले, मुन्शीू प्रेमचंद्र, ल्यु ओ टॉलस्टॉषय, मॅग्झी न गॉर्की, साने गुरूजी, जी.ए. कुलकर्णी, भालचंद्र नेमाडे, उद्धव शेळके, दया पवार यांच्याश साहित्याेच्याय वाचनातून वाड्.मयीन जडणघडण झाली. विद्यार्थी असताना मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे सिनियर रिसर्च फेलो म्हणून १९८५ – ८६ याकाळात काम केले.

* १९८६ पासून राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे पीकशास्त्र विषयाचे अध्‍यापक म्हणून काम केले. २०१४ साली ते सेवानिवृत्त झाले.

*  ‘बरा हाय घरचा गोठा’ (१९८३) हा मोहिते यांचा विद्यार्थी असताना प्रकाशित झालेला पहिला कथासंग्रह. मूळ पिंड कवितेचा. ‘पंधरा ऑगस्ट कवा हाय’ ही कविता बरीच गाजली. कथासंग्रहातून खेड्यातले जीवन तटस्थ पणे मांडले आहे. शेतकरी कुटुंबातील शेतकऱ्याच्या मुलाची मानसिकता या कथासंग्रहातील कथांमध्ये मांडली आहे.

*  ‘असं जगणं तोलाचं’ (१९९४) ही आत्मसचरित्रात्मीक कादंबरी. शेतकरी कुटुंबातील बालपण चितारणारी. आत्मपर अनुभूतीतून शेतकरी जीवनातील वाताहतीचा अचूकपणे वेध घेते. शेतकरी संघटनेच्या कार्याने त्यावतील सक्रिय सहभागाने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे एक डोळसवृत्तीने बघणारा लेखक यातून दिसतो. याच कादंबरीचा पुढचा भाग ‘धूळपेरणी’ (२००१) ही कादंबरी.

* ‘धूळपेरणी’ (२००१)  कादंबरीची  भाषा, लोकव्यवहार, राजकीय अंत प्रवाह, सामाजिक संबंध, आर्थिक ओढग्रस्ती, नैतिक बंध अशा अनेक अंगाने मराठवाड्यातील एका खेडयाचे रेखीव चित्रण येते. यातील सगळीच पात्रे आपल्याला जीवंतपणाचा प्रत्यय देणारी आहेत. ज्यामुळांपासून कादंबरीचा नायक तुटत जातो. त्यांचा रसरशीतपणा आणि व्यापक विस्तार तर लेखकाने फारच नेमकेपणाने उभा केला आहे. शेतकरी कुटुंब, परिवार, गावकी आणि प्रशासन यांचे हुबेहुब रेखाटन केले आहे.

*  ‘शेती व्यवसायावरील अरिष्ट’ (२००७) या वैचारिक पुस्तिकेत मोहिते यांनी शेतकऱ्यांच्या आत्म‍हत्येचे स्वरूप तर सांगितलेल आहेच, त्याचबरोबर त्याच्या कारणांची विस्ताराने चर्चा केली आहे.

* ‘बोलिलो जे कांही’ (२०१०) या ललित गद्य ग्रंथात समकालीन वास्तव टिपताना आपल्या देशातील प्रमुख व्यवसाय असलेल्या शेतीबद्दल, शेतीशास्त्रातील पदवी, चळवळीचा प्रत्यक्ष अनुभव व कुणब्याच्या घरात जन्मलो यामुळे त्यांतल्या शब्दांना वेगळंच वजन प्राप्त होतं. लेखक हा फक्त ललित लेखक नसतो तर समाजाच्या एकूणच घडामोडीत सहभागी असलेला जबाबदार घटक असतो. ह्याची साक्ष यातून दिसते.

* ‘ग्रामीण साहित्य : बदलते संदर्भ’ (२०१२) या ग्रंथात साहित्यातील बदलत्या घडामोडींचा वेध घेतलेला आहे. 

* ‘शोध गुणवत्तेचा’ (२००२) हा प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांचा गौरवग्रंथ.

* ‘ऐहिक माझे’ (२०१७) डॉ. सूर्यनारायण रणसूभे यांच्या निवडक वैचारिक लेखांच्या संग्रहाचे संपादन केले.

पुरस्कार -
# ‘असं जगणं तोलाचं’ (१९९४) या कादंबरीसाठी -
* महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा वा.म.जोशी सर्वश्रेष्ठ साहित्य पुरस्कार (१९९४),
* भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार
* शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठान, औरंगाबाद यांचा शेतकरी साहित्य पुरस्कार (१९९९).
# ‘धूळपेरणी’ (२००१) या कादंबरीसाठी -
* यशवंतराव दाते स्मृ्ती संस्थान, वर्धा यांचा बाबा पद्मनजी उत्कृष्ट साहित्य पुरस्कार (२००२)
* मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद
* नरहर कुरुंदकर साहित्य पुरस्कार (२००२)
* महाराष्ट्र शासनाचा हरि नारायण आपटे उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कार (२००२)
* उर्मी प्रतिष्ठान, जालना मुक्ताई पुरस्कार (२०१२).
* अध्यक्ष, तिसरे अ.भा. शेतकरी साहित्य् संमेलन, गडचिरोली २,२६ फेब्रुवारी २०१७.


शेषराव मोहिते
'जागल', यमुना सोसायटी, राजीव गांधी चौक,
लातूर - ४१३५३१

Comments

  1. डॉ.शेषराव मोहिते असं जगणं तोलाचं कादंबरीसाठी लक्षात राहतात.ही वाचल्यानंतर मी खूपच. प्रभावित झाले होतो.त्य ना जाऊन घरी भेटलो होतो.खरे तर ते माझ्या मामाकडे शेतकरी चळवळीच्या अंगाने यायचे.तिथंच माझी तोंडओळख होती, परंतु जगणंने मला त्यांच्या लेखनाचा परिचय झाला..मोहिते सरांकडून शेतकरी चळवळीबाबत दीर्घ सलग काहीतरी यायला हवे,मी त्याबाबत सरांना बोलतोही,परंतु सरांनी ते मनावर घेतलेलं दिसत नाही..

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts