अविनाश कोल्हे
प्रा. अविनाश राजाराम कोल्हे यांचा जन्म पाचोरा येथे इ.स. ०२ एप्रिल १९५७ मध्ये झाला. त्यांनी बीए.सी ही पदवी १९७८ ला पुणे विद्यापीठ, पुणे येथुन पुर्ण केली. एम. बी. ए. १९८० मध्ये केले. एल.एल.बी ची पदवी १९८३ मध्ये त्यांना प्राप्त झाली. त्यानंतर त्यांनी बी.ए. (१९९१) व एम.ए. राज्यशास्त्र (१९९३) या पदव्या संपादन केल्या.
एप्रिल २०१७ मध्ये रूपारेल महाविद्यालय, मुंबई येथुन राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले.
* गेली अनेक वर्ष ते ‘राष्ट्रीच राजकारण’ व ‘आंतरराष्ट्रीय राजकारण’ या विषयावर साप्ताहिक स्तंभलेखन करत आहेत. नाशिकहुन प्रसिद्ध होत असलेल्या ‘देशदूत टाईम्स’ या इंग्रजी वृत्तपत्रातही त्यांचे साप्ताहिक सदर असते.
* २००१ साली ऑस्ट्रीया या देशात भरलेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘लोकशाहीसमोरील आव्हाने’ या विषयावर शोधनिबंध सादर केला.
* २००२ साली अमेरिकन सरकारच्या निमंत्रणाहून - “‘९/११’ च्या घटनेचा अमेरिकन समाजावर काय परिणाम झाला” याचा अभ्यास केला.
* २००४ साली इराण ला शोधनिबंध सादर. २००४ हे वर्ष म्हणजे १९७९ साली इराणमध्ये झालेल्या धार्मिक क्रांतीचे रौप्यमहोत्सवी वर्ष. त्यानिमित्ताने आयोजित चर्चासत्रात त्यांनी शोधनिबंध सादर केला.
* अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग : प्रशासक ते पंतप्रधानः एक वाटचाल (अनुवादित, मूळ इंग्रजी) या आत्मचरित्रापर इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद त्यांनी केला.
* अल्बर्ट आईनस्टाईन : निवडक लेखन (अनुवादित, मूळ इंग्रजी, संपादक - जिम ग्रीन)
'भारताची फाळणी' (इतिहास, अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - अनिता इंदरसिंह) या ग्रंथाचा अनुवाद नॅशमल बुक ट्रस्ट, दिल्ली (NBT) ने प्रकाशित केला.
* सद्या ते मुंबई विद्यापीठात ‘चीनमधील झिंगयांग प्रांतातील मुस्लिम समाजातील अलगतेची चळवळ’ याविषयावर पीएच.डी या पदवीसाठी संशोधन करत आहेत. सेवानिवृत्तीनंतर चिकाटीने संशोधन, लेखन, अभ्यास करण्याची त्यांची सवय त्यांच्यातील संशोधकाची साक्ष देते.
* नाट्यपरीक्षणाची आवड. २०१६ साली लोकवाङ्मयगृह, मुंबई यांच्या प्रकाशनाने नाट्यपरिक्षणावरील ‘रंगदेवतेचे आंग्लरूप’ हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. यात मुंबईतील अ-मराठी रंगभूमी (हिंदी-इंग्रजी नाटकांचा परीक्षणसंग्रह)
* ‘सेकंड इनिंग’ हा दोन दीर्घ कथांचा संग्रह २०१७ मध्ये सदामंगल प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केला. याला महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाला.
* ‘चौकट वाटोळी’ ही कादंबरी २०१८ मध्ये विश्वकर्मा प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केली. या कादंबरीला वर्धा येथील ‘दाते पुरस्कार’ – जानेवारी २०१९ मध्ये मिळाला.
* मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे घेण्यात आलेल्या ‘हिंदू’ कादंबरीतील उपकथानकावर स्पर्धा घेण्यात आली. त्यातील पहिले पारितोषिक ‘पंगतीतले पान’ या कादंबरीला मिळाले.
अविनाश कोल्हे
मुंबई
Comments
Post a Comment