श्रीकांत देशमुख


श्रीकांत साहेबराव देशमुख : (जन्म : ०३ जुलै, १९६३) श्रीकांत देशमुख हे मराठी साहित्यातील महत्त्वाचे नाव. साहित्य अकादमी प्राप्त लेखक.

* जन्म ठिकाण : मौजे राहेरी (बु.) ता. सिंदखेडराजा, जि.बुलढाणा.

* कौटुंबिक माहिती :  पत्नी - शालिनी, मुलगा - सुशांत, मुलगी - मुक्ता.

* व्यवसाय : विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातुर या पदावर राज्यशासनाच्या सेवेत उच्च श्रेणी अधिकारी.

शैक्षणिक माहिती : 
* नुतन माध्यमिक विद्यालय, राहेरी (१० वी पर्यंत)
* शिवाजी महाविद्यालय, चिखली (१२ वी पर्यंत)
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (एम. ए., राज्यशास्त्र)
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (एम. फिल.- 'महाराष्ट्राची शेतकरी चळवळ')

प्रकाशित साहित्य :
कविता संग्रह :
* बळिवंत (१९९७)
* आषाढमाती (२००३)
*  बोलावे ते आम्ही (२०१३)

कादंबरी :
* पिढीजात

नाटक :
* नली (नाट्यरुपांतर, शंभु पाटील)

ललितगद्य :
* पडझड वाऱ्याच्या भिंती (२०१५)
* साखर कारखानदारीतले दादा (२०१६)

वैचारिक :
* महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ : प्रस्तावना डॉ. भा.ल.भोळे (१९९७)
* कुळवाडी भूषण शिवराय : प्रस्तावना डॉ. सदानंद मोरे (२०१३)

संपादन :
* महानोरांची कविता ( समीक्षा संपादन) (२००३)
* समकालीन साहित्यचर्चा : डॉ. नागनाथ कोतापल्ले गौरवग्रंथ (२०१०)
* भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य : नव्या पिढीचे अर्धशतकोत्तर पुरावलोकन (२०१५)

पुरस्कार :
* 'बोलावें ते आम्ही' या काव्यसंग्रहाला २०१७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार.
*  महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका (२००४)
* महाराष्ट्र राज्य शासन, केशवसुत पुरस्कार (२०१४)
* लोकमंगल पुरस्कार, सोलापूर (२०१३)
* मराठवाडा साहित्य परिषद, म.भि.चिटणीस पुरस्कार (१९९८)
* विशाखा साहित्य पुरस्कार, नाशिक (१९९८)
* पद्मश्री  विखे पाटील सन्मान, प्रवरानगर (१९९८)
* बी. रघुनाथ पुरस्कार, औरंगाबाद (१९९८)
* यशवंतराव चव्हाण सन्मान, पुणे (१९९८)
* कै.भि.ग.रोहमाने पुरस्कार, कोपरगाव (१९९८)
* दु:खी, राय हरिशचंद्र साहनी पुरस्कार, जालना (२००४)
* मराठवाडा साहित्य परिषद, कुसूमावती देशमुख पुरस्कार, औरंगाबाद (२००४)
* ना.घ.देशपांडे पुरस्कार, बुलढाणा (२००४)
* शिवार प्रतिष्ठान, शेतकरी साहित्य पुरस्कार, औरंगाबाद (२०१४)
* दाते प्रतिष्ठान, वर्धा (२०१४)
* चैत्रसंवाद, नाशिक (२०१४)
* नारायण सुर्वे पुरस्कार, अमरावती (२०१४)
* शब्दवेल प्रतिष्ठान, लातूर (२०१४)
* प्रसाद बन पुरस्कार, नांदेड (२०१४)
* मुद्रा पुरस्कार, जालना (२०१४)

संपर्क :
'बळिवंत' 
नरहरनगर, नृसिंह पॅलेसमागे, 
रिंगरोड, नांदेड. - ४३१६०५
Email - shrikantdeshk163@gmail.com


Comments

Popular Posts