प्रमोद कमलाकर माने



प्रमोद कमलाकर माने (जन्म - ०५/०२/१९८१)
प्रमोद माने हे मराठवाड्यातील, मराठी साहित्यातील महत्त्वाचे कवी, कादंबरीकार. त्यांचा जन्म उमरगा तालुक्यातील जकेकूर येथे झाला. प्रमोद माने हे कविता, कथा, ललितगद्य, कादंबरी या वाड्.मय प्रकारात लेखन करतात. त्यांच्या लेखनाचा मुख्य विषय शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि ग्रामीण जीवन हा आहे. त्यांनी 'कोरडवाहू' या ब्लाॅग लेखनातून जागतिक महाजालावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

कौटुंबिक माहिती :
प्रमोद माने यांचा जन्म महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात असलेल्या उमरगा तालुक्यातील जकेकूर या गावी एका अल्पभूधारक शेतकरी कुटूंबात झाला. घरी वारकरी संप्रदायाचा वारसा असल्याने त्यांच्यावर बालपणीच संत साहित्याचे संस्कार झाले. 
    अभावग्रस्त दुष्काळी परिस्थितीतील जीवन जगताना त्यांना वाचनाची गोडी लागली आणि आपले अनुभव ते कवितेतून मांडू लागले. 'कोरडवाहू' या कवितासंग्रहातील कवितांमधून हे अनुभवविश्व प्रकट होते. पत्नी - कलावती, अपत्य - आत्मजा.

शैक्षणिक माहिती :
प्रमोद माने हे एम.ए.(मराठी) सेट, नेट, डी.एड. आहेत. ते सध्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात(नांदेड) प्रा. संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 'एकविसाव्या शतकातील मराठी ग्रामीण कविता' या विषयावर पीएच.डी. करत आहेत.
  
व्यवसाय :
प्राथमिक शिक्षक. - उस्मानाबाद जिल्हा परिषद अंतर्गत शाळेत शिक्षक आहेत. 
जि. प. प्रा. शाळा होळी, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद. येथे कार्यरत. 

प्रकाशित साहित्य :
□ 'कोरडवाहू' हा कवितासंग्रह २००५ साली प्रकाशित.
  (प्रतिभास प्रकाशन, परभणी)
□ 'गावधूळ' आगामी कादंबरीचा अंश 'वाघूर' या दिवाळी अंकातून प्रकाशित.
□ एक कवितासंग्रह आणि ललित लेखसंग्रह प्रकाशनासाठी सिध्द.
□ विविध वाड्.मयीन नियत-अनियतकालिकांमधून कविता, कथा, ललितलेखन प्रकाशित.

पुरस्कार :
'कोरडवाहू या कवितासंग्रहास मिळालेले पुरस्कार-
□  महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबईचा 'यशवंतराव चव्हाण वाड्.मय पुरस्कार' प्राप्त.
□  स्व. बापूसाहेब ढोकरे राज्यस्तरीय काव्य पुरस्कार, अकोला.

इतर : 
□ साहित्य अकादमीकडून प्रवासवृत्ती जाहीर. 
□ 'खेळ' या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या 'गिळलो'  या कवितेची 'आसक्त,पुणे' यांच्या 'रिंगण' या नाट्याविष्कारासाठी निवड व सादरीकरण. 
□ 'वाघूर' या दिवाळी अंकात 'गावधूळ' या आगामी कादंबरीचा अंश प्रकाशित. 
□  प्रतिष्ठान, कविता-रति, खेळ, मिळून साऱ्याजणी, आपले वाड्.मयवृत्त इ.  विविध मराठी नियत-अनियतकालिकांमधून तसेच वाघूर,  युगांतर, शब्दालय इ. दिवाळी अंकांमधून  कविता कथा, ललितगद्य प्रकाशित.
□ अखिल भारतीय साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य संमेलन, शिक्षक साहित्य संमेलन इ. संमेलनात कवितावाचन.
□ 'जागतिकीकरणात मराठी कविता' या संपादित कवितासंग्रहात कवितेचा समावेश.  संपादक: उत्तम कांबळे 
हा कवितासंग्रह संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट.

आगामी पुस्तके :
□ पेरणी नक्षत्रांची (कवितासंग्रह)
□ गावधूळ (कादंबरी)
□ चांदवेल (ललित लेखसंग्रह)


संपर्क : 
मु.पो. जकेकूर, ता.उमरगा, जि.उस्मानाबाद.  ४१३६०४
ई-पत्ता: pramodmane52@gmail.com

Comments

  1. प्रमोद माने यांचे लेखन मी वाचले आहे. वाघूर दिवाळी अंकातील 'धूळमाती ' हा कादंबरी अंश वाचून त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या. उमरगा परिसरातील बोलीतून लिहिणारे ते आश्वासक लेखक व कवी आहेत.

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts