बालाजी मदन इंगळे



बालाजी मदन इंगळे हे मराठीतील कवी, कादंबरीकार आहेत. त्यांचा जन्म १७ ऑगस्ट १९७५ रोजी एकोंडी (जहांगीर) ता. उमरगा, जिल्हा उस्मानाबाद,  येथे झाला. त्यांचे शिक्षण एम.ए.(मराठी), बी.एड. झाले असुन त्यांनी कांही महिन्यांन पुर्वी पीएच.डी पदवीसाठी डॉ. पी. विठ्ठल यांच्या मार्गदर्शनाने 'मराठवाडा कर्नाटक सीमेलगतची मराठी बोली : एक चिकित्सक अभ्यास' या विषयावर शोधप्रबंध स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाकडे सादर केला आहे.

प्रकाशित साहित्य :
$ कवितासंग्रह 
* मातरं (नीळकंठ प्रकाशन, पुणे - २००२)
* मेलं नाही अजून आभाळ (लोकवाङ्मय गृह प्रकाशन, मुंबई)
* या परावलंबी दिवसीय (२०२०)

$ बालकविता संग्रह 
* रंगीत रंगीत रानफुल (इसाप प्रकाशन, नांदेड)

$ कादंबरी 
* झिम् पोरी झिम् (जनशक्ती प्रकाशन, औरंगाबाद - २००९)

$ संपादित
* स्पंदन (निर्मिती प्रकाशन, उमरगा - २००८)

पुरस्कार 

# 'मातरं' या काव्यसंग्रहासाठी
* महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा 'यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार'.
* शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठान, औरंगाबाद यांचा 'शेतकरी साहित्य पुरस्कार'
# 'झिम् पोरी झिम्' या कादंबरीसाठी
* महाराष्ट्र शासनाचा 'उद्धव ज. शेळके पुरस्कार'
* महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा 'शंकर पाटील साहित्य पुरस्कार'
* खान्देशक्या स्व. स्मिता पाटील साहित्य पुरस्कार (धुळे)
* श्री. चक्रधर स्वामी मोरगे उत्कृष्ठ वाङ्मय निर्मिती पुरस्कार (नांदेड)
* कै. बळिरां मोरगे उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार (लातूर)
* लळित रंगभीमी, पुणे यांचा 'लळित साहित्य पुरस्कार'
#  'मेलं नाही अजून आभाळ' या काव्यसंग्रहास
* गदिमा साहित्य पुरस्कार, पुणे.
* आपटे वाचन मंदिर, यांचा 'इंदिरा संत काव्यपुरस्कार' (इचलकरंजी)
* कविवर्य रा.ना.पवार प्रतिष्ठानचा 'रा.ना.पवार काव्यपुरस्कार' (सोलापूर)
* कै. अंजनीबाई वाघमारे काव्यपुरस्कार (सोलापूर)
* कै. भि.ग. रोहमाने ग्रामीण साहित्य पुरस्कार (कोपरगांव)
* कै. मोरेश्वर पटवर्धन काव्य पुरस्कार (मुंबई)

इतर पुरस्कार 
* महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार.
* अध्यक्ष, राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन, औरंगाबाद.
* अध्यक्ष, जिल्हा स्तरीय बालकुमार साहित्य संमेलन, अंबाजोगाई.
* 'मायबोली शब्दकोश' हा बोलीभाषा - प्रमाणभाषा शब्दकोश तयार केला.
* 'अक्षरपेरणी' हा विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधिक कविता संग्रहाचे संपादन केले.
* 'झेप' या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या चरित्रग्रंथाचे संपादन.
* इ. ६ वी बालभारती पाठ्यपुस्तकात 'झिम् पोरी झिम्' मधील उताऱ्याचा समावेश.
* स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड च्या अभ्यसक्रमात कवितेचा समावेश
* शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर च्या पदवी अभ्यासक्रमात 'झिम् पोरी झिम्' कादंबरीचा समावेश.
* मुंबई विद्यापीठ, मुंबई च्या अभ्यासक्रमात कवितेचा समावेश.
* मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूरचा उत्कृष्ट बालकवितासंग्रह पुरस्कार.

Comments

Popular Posts