नानासाहेब पवार



नानासाहेब धोंडिबा पवार (जन्म: ५ जून १९७६) हे एक मराठी लेखक व प्राध्यापक आहेत. इ.स. २००२ मध्ये, त्यांनी [[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठातून]] एम.ए. (मराठी) पदवी पुर्ण केली.

कारकीर्द 
* इ.स. २००५ साली ते विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने घेतली जाणारी National Eligibility Test (NET) ही परीक्षा उत्तीर्ण झाले.
* 'निंबाजी पवार लिखित शरद पवार यांचे चरित्र:एक अभ्यास' हा विषयावर एम.फिल. या पदवीसाठी [[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ]] यांच्याकडे [[नागनाथ कोत्तापल्ले]] यांच्या मार्गदर्शनाने प्रबंधीका सादर केली.
* पीएच.डी. पदवीसाठी 'यशवंतराव चव्हाण: व्यक्ती आणि वाङमय' या विषयावर [[राजन गवस]] यांच्या मार्गदर्शनाने पुणे विद्यापीठात प्रबंध सादर केला.
* त्यांनी "कृषीसाहित्याची संकल्पना आणि राजन गवस यांच्या कादंबऱ्यांमधील वैश्विक कृषीविश्व" या विषयावर लघुशोध प्रबंधिका विद्यापीठ अनुदान आयोगाकडे जानेवारी २०१४ मध्ये सादर केली.
* पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालय, सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे ४ सप्टेबर २००६ रोजी ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. सप्टेंबर २०१९ मधे सहयोगी प्राध्यापक म्हणुन त्यांची पदोन्नती झाली.

प्रकाशित साहित्य 
* ''यशवंतराव चव्हाण : व्यक्ती आणि वाङमय'' (स्नेहवर्धन पब्लिकेशन्स, पुणे, २०१३)
* ''भूमिपुत्र'' (दर्या प्रकाशन, पुणे, २०१६)
* ''साहित्यिक यशवंतराव चव्हाण'' (हर्मिश प्रकाशन, पुणे, २०१८)

मार्गदर्शक 

पीएच.डी. पदवीसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी -
* विसपुते शिवाजी जनार्दन - “स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरीची कथनपरंपरा” (एप्रिल २०१९ - पुर्ण)
* रोहमरे उज्ज्वला मधुकर - “डॉ. आनंदीबाई जोशी, ह्यांच्या चरित्राचा  सांस्कृतिक व शैलीमीमांसक अभ्यास”
* चेँडके अमोघशिद्ध - “मध्ययुगीन कालखंडातील वारकरी व सूफी संप्रदाय तुलनात्मक अभ्यास”
*मोरे सुधीर बबरु- “जगतिकीकरणा परिणामा  संदर्भातनव्वदोत्तर मराठी आणि हिंदी साहित्यातील निवडक  कादंबऱ्या यांचा तुलनात्मकअभ्यास (एप्रिल २०१९ - पुर्ण)
* चव्हाण शशिकांत शामराव - “गांधीवादी विचारांचा मराठी साहित्यावरील प्रभाव”
*शेवाळे प्रगती विश्राम - "भारतीय राजकारण आणि मराठी कविता : कालखंड १९७० ते १९८०"

इतर 

* अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, सोपान नगर (सासवड शाखा)

Comments

Popular Posts