नागवेल

 नागवेल यालाच नागार्जुन वेल असे ही म्हणतात.  सहसा काटेरी झुडुपांमधे व खारचोपणाची जमीन असलेल्या भागात ही दुर्मिळ वनस्पती मिळुन येते.नेहमी तोंडात फोड येणे, तोंडाची चव जाणे, भुक मंदावने, महिलांचे अंगात खुप गर्मी होवुन पदर वाहात असेल तर या वेलीची मुठभर पानं आणुन साफ धुवुन ठेचावीत व कपभर दही, ताक यामधे मिसळुन सकाळी सकाळी रिकाम्या पोटी खावी. लगेच तोंडात तुरट पणा व जिभेवर कींचीत राठपणा येवुन एका तासातच तोंडातील गर्मी व फोडांचा त्रास कमी होवुश भुक लागेल. तोंडात आलेल्या फोडांमुळे साध पाणीसुद्धा झोंबत महिणो महिणे त्रास राहतो पोटभर जेवण जात नाही म्हणुन पोटही साफ होत नाही.नागार्जुन रसामुळे वरील त्रास कायम नष्ट होतो.केवळ तिन ते सात दिवसच रस प्यावा.ही वनस्पती खुपच शितगुणी आहे.अतिसेवनाने शरीरात वात वाढु शकतो म्हणुन सावधान.अन्यथा नैसर्गीक अमरुतच असुन या रसाचे गुणच आहेत.साईड ईफेक्ट नाहीत.

पानं ओळखण्याची पद्धत : या वेलीची पाने हाताला राठ, जाडसर व  कडक लागतात दुमडली असता कटकन तुटतात ही प्रमुख ओळख आहे.जुलै ते आँक्टोबर या ऊष्ण ऋतुमधे काटेरी कथारचे झुडुपात मिळुन येतात.कथारची पानंसुद्धा याच पानांसारखी दिसतात परंतु पातळ असतात. गफलत होवु नये म्हणुन दुमडुन पहाल्यास कटकन मोडनार पान हेच नागार्जुन चे समजावे.

Comments

Popular Posts