Skip to main content

Posts

Featured

दसरा : रीत भात आणि आपण

दसरा : दसरा हा साडेतिन मुहुर्तातील एक मुहुर्त मानला जातो. दसरा म्हटलं की आपल्याला नविन कपडे पुरणपोळीच जेवण आणि पतंगांची उधळण या गोष्टी पटकन आठवतात. प्रत्येक ठिकाणी हा सण साजरा करण्याची पद्धत मात्र वेगळी दिसते. मराठवाड्यातील कांही भागात आजही सिमोलंघ्घन केल जात. देवीच्या मंदिरातजाऊन सोन (आपट्याच्या झाडाची पाने व सौंदडीच्या  (शमीवृक्ष) / समदडीच्या झाडाची पाने यालाच या दिवशी सोन म्हणतात.) दिलं व घेतल जात.  सिमोल्लंघन करुन आल्यानंतर घरातील बायका पुरुषांना ओवाळतात व घरातील लहान मंडळी मोठ्यांना सोन देऊन त्यांचे आशीर्वाद घेतात. सोन दिल्यानंतर कडकणी खायला देण्याची पद्धत अनेक ठिकाणी दिसते. (मराठवाड्यात) हे या दिवशीच्या खाद्यपदार्थाचे वेगळेपण दिसते.           कडकणी हा प्रकार या दिवशीचा विशेष खाद्यपदार्थ. देवासमोर देवघराला कडकण्या दोरीत ओवुन बांधल्या जातात. त्यात आरसा, फणी, बांगड्या, जोडवे, आणि पाच कडकण्या अस केलेलं असतं. आता म्हणालं ही सौंदर्यप्रसाधने कशासाठी तर तीही कडकण्याच्या पिठाचीच केलेली असतात. सिमोलंघ्घन करुन आल्यानंतर देवाला सोन द्यायचं आणि त्याच्या जवळची एक कडकणी मोडुण घ्यायची. अशी पद्धत

Latest Posts

रा. रं. बोराडे

प्रा. भगवंत देशमुख

नागवेल

लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी

दा.गो. काळे